AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे..; सुनावणीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray : पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे..; सुनावणीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

| Updated on: Jul 14, 2025 | 5:49 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यांच्यावरील वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता ऑगस्ट 2025 मध्ये होणार आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.

ठाकरे म्हणाले, ऑगस्टमध्ये या प्रकरणाचा निकाल लागणार असेल, तर ही निश्चितच समाधानकारक बाब आहे. सर्वोच्च न्यायालय ही आमची शेवटची आशा आहे, जिथे या चोरीच्या प्रकरणाचा निवाडा होईल. आमचे चिन्ह चोरले गेले आहे. मी नेहमी म्हणतो, निवडणूक आयोगाला चिन्ह देण्याचा अधिकार आहे, पण पक्षाचे नाव बदलण्याचा किंवा कोणाचे नाव उचलून दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही. असा अधिकार आयोगाला असूच शकत नाही आणि आम्ही तो मान्यही करणार नाही. चिन्हाबाबतचा वादही कोर्टात आहे, आणि आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, असंही ठाकरे म्हणाले.

Published on: Jul 14, 2025 05:48 PM