उद्धव ठाकरे कुटुंबिय पहिल्याच दिवशी लालबागच्या चरणी नतमस्तक
राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे सहकुटुंब पोहचले. त्यानंतर उद्धव ठाकरे प्रसिद्ध लालबागच्या दर्शनाला पोहचले.
उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी सकाळी सहकुटुंब गणपती दर्शनासाठी गेले होते. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या दहा मिनिटं स्वतंत्र चर्चा देखील झाली होती. या चर्चेतील तपशील मात्र समजू शकलेला नाही. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर उद्धव ठाकरे हे तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची गुप्तपणे चर्चा झाली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे अडीच तास होते. त्यानंतर उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले. त्यांच्यासोबत चिरंजीव आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. गृहमंत्री अमित शाह देखील लालबागच्या दर्शनाला मुंबईत येणार आहेत.

