अमित शाह शिवनेरी किल्ल्यावर जाणार, शिवजयंती सोहळ्याला लावणार हजेरी
VIDEO | शिवनेरी किल्ल्यावर शिवजंयती सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राहणार उपस्थित
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १९ फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती सोहळ्याला अमित शाह हजेरी लावणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी असणाऱ्या अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे. तर येत्या १८ फेब्रुवारी आणि १९ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. यामुळे या दौऱ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त असणार आहे. पुण्यात १८ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुपारी पुण्या येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पुस्तक प्रकाशन होणार आहे. त्यानंतर ते पुण्यात मुक्काम करतील आणि १९ फेब्रुवारीला सकाळी शिवसृष्टीचे लोकार्पण झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिवनेरी किल्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

