Nagpur | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक, नागपुरात शिवसेना कार्यकर्त्यांकडून जल्लोष

दिवसभर राणे यांच्या विरोधात प्रदर्शन केल्यानंतर आता या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ढोल वाजवत आणि नाचगाणी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 24, 2021 | 8:42 PM

नागपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर नागपुरात शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. दिवसभर राणे यांच्या विरोधात प्रदर्शन केल्यानंतर आता या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ढोल वाजवत आणि नाचगाणी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी पोस्टरवर जोडे मारत निषेध केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें