Narayan Rane | पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नारायण राणे संतापले

खोटं बोलणाऱ्यांची शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेतून हकालपट्टी केली होती, असं सांगताना मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण रोख तुमच्याकडे होता, असं राणेंना विचारण्यात आलं. त्यावर राणे भडकले

सिंधुदुर्ग: शिवसेना प्रमुखांना खोटं बोलणारी माणसं आवडत नव्हती. म्हणून त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यांचा रोख तुमच्याकडे होता, त्यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे? असं विचारताच केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे भडकले. शिवसेनेतून माझी हकालपट्टी?, उगाच काही तरी म्हणू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया देत राणेंनी अधिक बोलणं टाळलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना नारायण राणे यांना सवाल करण्यात आला. खोटं बोलणाऱ्यांची शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेतून हकालपट्टी केली होती, असं सांगताना मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण रोख तुमच्याकडे होता, असं राणेंना विचारण्यात आलं. त्यावर राणे भडकले. माझी हकालपट्टी केली? ये उगाच काय ते मला चिडवू नको. माझं नाव नाही घेतलं त्यांनी. काय बोलतो?, असं राणे संतापून म्हणाले. त्यानंतर त्यांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI