AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unseasonal Rain Alert Mumbai | मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...

Unseasonal Rain Alert Mumbai | मुंबई, पुण्यावरही ‘अवकाळी’ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची…

| Updated on: Apr 05, 2026 | 2:30 PM
Share

भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा मोठा इशारा दिला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आता मुंबई, पालघरसारख्या शहारांनासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे ठरणार आहेत. नेमकं काय घडणार?

भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा मोठा इशारा दिला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आता मुंबई, पालघरसारख्या शहारांनासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे ठऱणार आहेत. काल विविध राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले.  या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मार्च महिन्यापासूनच सुरूवात झाली पण पाऊस काही थांबत नाहीये.

उत्तर मध्य कोकणात मध्यम तसंच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर आजही राज्यात पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. काही भागात आजही गारपिटीची शक्यता आहे. त्यामुळे राज्याभरतील विविध भागात पुढील 24 तास हवामानाच्या अंदाजाने खूप महत्त्वाचे ठरतील.

Published on: Apr 03, 2026 11:51 AM
Follow Us