अवकाळी अन् गारपीटनं बळीराजा हतबल, आंब्याचा मोहोर गळाल्यानं शेतकरी चिंतेत
VIDEO | परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर, गारपिटीने ‘आंबा’ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, आंबा उत्पादक हतबल
परभणी : गेल्या दोन आठवड्यापासून परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने जिल्ह्यातील आंब्याच्या पिकाचे मोठ्यप्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पूर्णा, जिंतूर आणि मानवत तालुक्यातील अनेक गावाच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अस्मानी संकटामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या भागातील आंबा उत्पादक शेतकरी हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट होत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील जळगाव, नांदेड, अमरावती, बीड, नाशिक या जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेलं पीकं अवकाळी पावसाने वाया गेल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच आता अंब्याचा हंगाम असताना आंब्याचा मोहोर गळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने बळीराजा चिंतेत आहे.
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...

