ऐन उन्हाळ्यात ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लगा… दरवाढ होण्याची शक्यता
महावितरणने १ एप्रिलपासून वीज दरांमध्ये ३७ टक्क्यांची मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तर त्यावर जनतेची मतं मागविण्यात आली होती. वीजदर निश्चितीच्या या याचिकेवर शुक्रवारी जनसुनावणी होणार आहे.
मुंबई : राज्यात अवकाळीमुळे आधीच मोठे नुसकान झाले आहे. तर याच्या आधी गृहनींच्या डोळ्याच पाणी आणणारे गॅस सिलिंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यातच वाढत्या महागाईमुळे देखील जनता त्रस्त झाली आहे. यातच आता महावितरणचा शॉक देखील जोरदार बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जनतेची शॉक लगा… या जाहिराती प्रमाणे केस उभे राहण्याची शक्यता आहे.
महावितरणने १ एप्रिलपासून वीज दरांमध्ये ३७ टक्क्यांची मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तर त्यावर जनतेची मतं मागविण्यात आली होती. वीजदर निश्चितीच्या या याचिकेवर शुक्रवारी जनसुनावणी होणार आहे. ही सुनावणी महाराष्ट्र वीज नियमक आयोगासमोर होणार असून मार्च अखेरीस नवे दर लागू होण्याची शक्यता आहे.

