जेलमधून सुटल्यानंतर नवनीत राणा यांनी दिल्ली गाठत राज्य सरकार आणि पोलिसांनी संसदीय समिती आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर हेच राणा दाम्पत्य संजय राऊत यांच्यासोबत लडाख दौराही करताना दिसून आलं. त्यानंतर आजा ते नागपुरात आले. यावेळी नागपुरात येताच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जोरदार घोषाबाजी केली. ‘जय हनुमान, जय संविधान, जय श्रीरामच्या’ घोषणांनी यावेळी त्यांनी नागपूर दणाणून सोडलं. माझ्या महाराष्ट्राला शनी लागला आहे तो दुर करण्यासाठी हनुमान चाळीसा पठण करत आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी राणा यांनी दिली आहे.