Special Report | यूपीत भाजपची पडझड, शिवसेनेची धावाधाव!

महिन्याभरआधी पंतप्रधान मोदींनी, समाजवादी पार्टीवर हल्लाबोल करत. भाजपच्या विजयाचा दावा केला. मात्र सध्या उत्तर प्रदेशात भाजपला रोज मोठे मोठे धक्के बसत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने उत्तरप्रदेशात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

लखनऊ : महिन्याभरआधी पंतप्रधान मोदींनी, समाजवादी पार्टीवर हल्लाबोल करत. भाजपच्या विजयाचा दावा केला. मात्र सध्या उत्तर प्रदेशात भाजपला रोज मोठे मोठे धक्के बसत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत 3 मंत्री 11 आमदार असे, एकूण 14 आमदारांनी भाजपला रामराम करत, झटका दिलाय. दुसरीकडे राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेनंही उत्तर प्रदेशात निवडणूक लढवण्याची घोषणा केलीये. अखिलेश (Akhilesh Yadav) यादव यांच्या समाजवादी पार्टीनं राष्ट्रवादीसाठी एक जागा सोडलीय. मात्र अखिलेश यांच्या आघाडीत शिवसेनेला तूर्तास तरी स्थान मिळालेलं नाही. तर 50 ते 100 जागा लढणार अशी घोषणा करून संजय राऊतांनी (Sanjay Raut)  मुजफ्फरनगरमध्ये शेतकरी राकेश टिकैत यांची भेट घेतली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI