डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी, पुतळ्याची प्रतिकृती नेमकी कशी? पाहा…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने पाहणी केली. दरम्यान सध्या या पुतळ्याची प्रतिकृती नेमकी कशी आहे याचा आढावा घेतला आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी...
गाझियाबाद, उत्तर प्रदेश : इंदू मिल स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा साकारण्यात येणार आहे. या पुतळ्याची प्रतिकृती उत्तर प्रदेशमधल्या गाजियाबादमध्ये तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने पुतळ्याची पाहणी केलीय. 350 फुटांचा ब्रॉन्झचा पुतळा स्मारकामध्ये साकारला जाणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या समितीच्या सदस्यांमध्ये एकमत नाही. स्मारकामध्ये निर्माण करण्यात येणाऱ्या सभागृहमधील संख्येवरून आता वाद निर्माण झालाय. सरकारने आर्किटेक्चर नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदार यामीनी जाधव यांनीही सरकारकडे मागणी केली केली आहे. दरम्यान सध्या या पुतळ्याची प्रतिकृती नेमकी कशी आहे ? पाहा…
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

