वंजारी समाजाला एसटी आरक्षण द्या; बीडमध्ये चक्काजाम आंदोलन
बीडमध्ये वंजारी समाजाने जय भगवान महासंघाच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन केले. हैदराबाद गॅझेटच्या आधारे वंजारी समाजाला एसटी आरक्षण मिळावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
बीड शहरातील राष्ट्रसंत भगवान बाबा चौकामध्ये जय भगवान महासंघाच्या नेतृत्वाखाली वंजारी समाजाचे चक्काजाम आंदोलन झाले. बाळासाहेब सानप यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्याप्रमाणे हे आंदोलन राज्यभरात आयोजित करण्यात आले होते. आंदोलकांची प्रमुख मागणी आहे की, महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यास वंजारी समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे. त्यांची दुसरी मागणी वंजारी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची आहे.
आंदोलकांनी सरकारवर एकाच समाजाला वेगळी वागणूक देत असल्याचा आरोप केला. जर हैदराबाद गॅझेट लागू करायचे असेल, तर ते वंजारी, लमान आणि धनगर या समाजांनाही एसटी आरक्षण देण्यासाठी वापरले जावे, कारण त्यांच्या नोंदीही गॅझेटमध्ये आहेत. अन्यथा, सरकारने हे गॅझेट पूर्णपणे रद्द करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.
थार, फॉर्च्युनर गाड्या अन् बरंच काही! सांगलीत बैलगाडा शर्यतीचा धुरळा
दादागटात 2 पैकी कोणती बहीण लाडकी?रुपाली ठोंबरेंना नोटीस, कारवाई होणार?
'तो' व्हिडीओ बाहेर, जरांगेंनी आव्हान स्विकारलं अन् मुंडेंना चॅलेंज
उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी

