Rajesh Tope | लसीकरणामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी : राजेश टोपे

राज्य मंत्रीमंडळाची आज महत्त्वपूर्म बैठक पार पडली, या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईसह राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत आणि आगामी काळातील उपाययोजनांबाबत माहिती दिली.

राज्य मंत्रीमंडळाची आज महत्त्वपूर्म बैठक पार पडली, या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईसह राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत आणि आगामी काळातील उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी टोपे म्हणाले की, तिसऱ्या लाटेच्या संदर्भात आज मंत्रीमंडळात चर्चा झाली, केरळच्या पार्श्वभूमीवर जिथे ओणम साजरा झाला तिथे मोठी गर्दी झाली त्याचा परिणाम जाणवतो. मी स्वतः केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी बोललो आहे, फोनवर बोललो ३१ हजार केसेस एका दिवशी आल्यात त्याची कारणं काय? आणि केरळपासून तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असे समजायचे का? असे विचारले असता त्यांनी ओणम सणामुळे आणि दुसरे चाचण्यांची संख्या वाढविली आहे त्यामुळे संख्या वाढली आहे. तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी राज्याने पूर्ण तयारी केली आहे. जून महिन्यात केंद्र शासनाने जे सांगितले की जून महिन्यात तिसरी लाट येऊ शकेल त्याची संख्या ६० लाख लोक बाधित होऊ शकतील, आणि त्याच्या टक्केवारीत 12 टक्के ऑक्सिजन लागेल, मात्र दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता ही जी आकडेवारी आहे त्याला धरून तयारी करीत असतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI