Vaishnavi Hagawane Case : चेहऱ्यावरून रक्त येत असतानाही पोलीस मला समजवायचे; हगवणेंच्या मोठ्या सुनेने सांगितल्या वेदनादायी आठवणी
Mayuri Jagtap Hagawane : वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर आता हगवणे यांच्या मोठ्या सूनेकडून देखील कुटुंबावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत.
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर हुंड्यासाठी सुनेचा छळ करणाऱ्या हगवणे कुटुंबाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. एकीकडे वैष्णवीच्या आई-वडिलांकडून लग्नात कोट्यवधी रुपयांचा हुंडा घेऊनही तिचा आणखी हुंड्यासाठी छळ करणाऱ्या हगवणे यांची मोठी सून देखील याच त्रासाला कंटाळून माहेरी आलेली असल्याचं समोर आलं आहे. आज राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेने हगवणे कुटुंबाचे सगळे काळे कारनामे टीव्ही9 मराठीवर बोलताना उघड केले आहेत. यावेळी मयूरी जगताप हिला त्य छळाच्या वेदनादायी आठवणींनी अश्रु अनावर झालेले बघायला मिळाले.
यावेळी बोलताना मयूरीने सांगितलं की, मला मारहाण झाल्यावर मी पोलिसात तक्रार केली होती आणि आई व भावाला कळवलं होतं. माझे मिस्टर नसताना हे लोक यायचे आणि मला मारहाण करायचे आणि घरात कोंडून ठेवायचे. त्यानंतर ते पोलीस ठाण्यात सर्वात आधी जायचे. आमच्याकडून गाड्या वगैरे आमच्या हक्काचं काढून घेतलं होतं. आम्ही रात्रीचा प्रवास करू शकत नव्हतो. पोलिसांनी फक्त एनसीच घेतली. पण तक्रार घेतली नाही. चेहऱ्यावरून रक्त येत असतानाही पोलीस माझी समजूत घालत असायचे. मिटून घ्या. घरातीलच गोष्ट आहे, असं पोलीस म्हणायचे. मी प्रत्युत्तर देणं हे चुकीचं होतं म्हणून ते मला मारहाण करायचे. जे चुकीचं आहे, त्याला मी विरोध करायचे त्यामुळे त्यांनी मला मारहाण केली. सासू आधी माझ्याशी चांगली वागायची. पण त्यांच्या लेकीचं ऐकून त्या मला नंतर त्रास द्यायच्या. मी माझ्या मिस्टरांनाही सांगितलं. त्यानंतर आम्ही वेगळे राहत होतो. मला माझ्या नवऱ्याची साथ होती म्हणून मी सर्व निभावून नेलं. पण वैष्णवीला तिच्या नवऱ्याची कधीच साथ मिळाली नाही, त्यामुळे हे सर्व घडलं, असं म्हणताना मयूरीचे डोळे पाणावले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

