Vaishnavi Hagawane Case : अखेर वैष्णविचा चिमुकला आजी-आजोबांच्या कुशीत विसावला
Vaishnavi Hagawane Death Case Updates : वैष्णवीचा 9 महिन्यांचा मुलगा आज अखेर तिच्या कुटुंबाला सोपवण्यात आलेला आहे. यावेळी नातवाला पाहून वैष्णवीच्या आई-वडिलांना अश्रु अनावर झाले.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. वैष्णवीला एक 9 महिन्यांचं चिमूकलं बाळ देखील आहे. तिच्या मृत्यूनंतर हे बाळ कुठे आहे याबद्दल कोणतीच खात्रीशीर माहिती नसल्याने वैष्णवीच्या आई-वडिलांनी काल आमचा नातू आम्हाला परत द्या अशी मागणी केली होती. त्यानंतर आज अखेर वैष्णवीचं बाळ तिच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आलेलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना आम्ही सकाळपासून बाळाला शोधत होतो. आम्हाला कॉल आला आणि एका ठिकाणी बाळ देण्यात आलं. मात्र कोणी बाळ दिलं याची माहिती नाही, अशी प्रतिक्रिया वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी दिली. 16 मे रोजी वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर बावधन पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्यासह मुलगा शशांक हगवणे आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंद अटकेत असून सासरे आणि दीर फरार आहेत.

पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ

पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?

16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?

मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
