Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी महिला आयोगाकडून दखल; कारवाईचा अहवाल मागवला
National Commission for Women : राष्ट्रीय महिला आयोगाकडून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आलेली आहे. या प्रकरणी बावधन पोलिसांकडून कारवाईचा अहवाल महिला आयोगाने मागवला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी असलेले राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक हगवणे याच्याशी वैष्णवीचा प्रेमविवाह झाला होता. मात्र हुंड्यासाठी तिचा छळ केला जात होता, असा आरोप तिच्या कुटुंबाकडून करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाची दाखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. तर सासरे राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे फरार आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना या प्रकरणाची निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोप सिद्ध झाल्यास सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

येड्या गबाळ्या सारखं काहीही म्हणेल, त्याला.. ; राऊतांचा पलटवार

गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ; दुतोंड्या मारोती गुडघ्यापर्यंत पाण्यात

राज्यात पावसाचं थैमान, मुंबई-महाराष्ट्राला IMD चा अलर्ट, 4 दिवसांत...

ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर घास..., मनसेचा राऊतांवर निशाणा
