Vaishnavi Hagawane Case : हा हुंडाबळीच…तिचे वडील ICU मध्ये अन् वैष्णवी मला एकच म्हणाली… मामानं जे काही सांगितलं ते धक्कादायक
'लग्नाची बोलणी करण्यासाठी जी बैठक झाली त्या बैठकीत शंशाककडून फॉर्च्यूनर गाडीचा आग्रह धरला. तसेच सोन्याची मागणी झाली. एक लाख 20 हजाराचे घड्याळ घेतले आणि...'वैष्णवीच्या मामाने काय सांगितले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षातील नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेचा मृत्यू नंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शंशाक फरार असून असतानाच राजेंद्र हागवणे यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एक एक खुलासे होत आहेत. अशातच वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला.
यावेळी त्यांनी हगवणे कुटुंबीयांवर आरोप करत वैष्णवी हगवणे हिचा झालेला संशयास्पद मृत्यू हा हुंडाबळीचाच प्रकार असल्याचे म्हटलंय. तर अजित पवार या लग्नात होते, आता त्यांनी त्यांच्या बहिणीला न्याय द्यावा, अशी मागणी वैष्णवीचे मामा बहिरट यांनी केली आहे. ‘वैष्णवीच लव्ह मॅरेज आहे. या लग्नाला कुटुंबातील सर्वांचा विरोध होता. परंतु वैष्णवी माझ्याकडे सातत्याने शंशाक सोबत लग्न करायचे आहे, असे सांगत होती. हगवणे कुटुंबाने तिच्यावर काय जादू केला, तिला पूर्ण संमोहीत केले होते, त्यामुळे ती ऐकवण्यास तयार नव्हती. तिने शेवटी हे लग्न केलेच आणि सहा महिन्यानंतर जे काही घडू लागले, तेव्हा वैष्णवी मला म्हणाली मामा माझी चूक झाली.’, असे मामांनी सांगितले.