Vaishnvi Hagawane : शशांकने वैष्णवीला केली होती पाईपने अमानुष मारहाण; पोलिसांनी पाईप जप्त केला
Vaishnavi Hagawane Case Investigation : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 12 जणांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. यातून शशांकवर दाखल गुन्ह्यात आणखी एका कलमाची भर पडली आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आत्तापर्यंत 12 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आलेल्या आहेत. वैष्णवीला तिचा नवरा शशांक याने पाईपने मारहाण केल्याचं यातून उघड झालं आहे. वैष्णवीला मारहाण केलेला पाईप देखील आता पोलिसांनी जप्त केलेला आहे.
वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचा प्रेमविवाह झालेला होता. मात्र लग्नाच्या 6 महिन्यांनीच वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला. विशेष म्हणजे घरच्यांच्या विरोधात जाऊन वैष्णवीने हे लग्न केलेलं असूनही वैष्णवीच्या वडिलांनी लग्नात 51 तोळे सोनं, 7.5 किलोची चांदीची भांडी आणि फॉरच्युनर कार हुंडा म्हणून दिलेली होती. तरीही वैष्णवीला सासरी आणखी हुंड्यासाठी त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी हगवणे कुटुंबाला ताब्यात घेतलं आहे. आता या प्रकरणात नवीन खुलासा झालेला असून पती शशांककडून वैष्णवीला पाईपने मारहाण झाली असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी आणखी एक कलम वाढवला आहे.