Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण; हगवणे पितापुत्राला पोलीस कोठडी, कोर्टात काय घडलं?
Vaishnavi Hagawane Case Updates : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज हगवणे पिता-पुत्राला स्वारगेट परिसरातून अटक केल्यानंतर शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं. यावेळी न्यायालयाने या दोघांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर याच प्रकरणी वैष्णवीची सासू, नणंद आणि पतीला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी यापूर्वीच कोर्टाने सुनावलेली आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याने तिने हे टोकाच पाऊल उचललं असल्याचं समोर आलं होतं. तर वैष्णवीच्या कुटुंबाकडून हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप देखील करण्यात आलेले आहेत. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात हगवणे कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर लागलीच मृत वैष्णवीची सासू, नणंद आणि पतीला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती. तर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते. त्यांना आज पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली.