Ajit Pawar : वैष्णवीच्या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही; अजित पवार यांची मोठी प्रतिक्रिया
Ajit Pawar On Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात माझा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया देत अजित पवार यांनी दिली असून मी कार्यकर्त्यांना असं वागायला सांगत नाही, असंही म्हंटलं आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात माझा काहीही संबंध नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे. काहीजण मला विनाकारण बदनाम करता आहेत, असंही अजित पवार यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हंटलं. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांना फोन करून अधिकची पथकं चौकशीसाठी लावण्यास सांगितली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी होते. राजेंद्र हगवणे यांच्या मुळाशी वैष्णवीचा प्रेमविवाह झालेला होता. या लग्नात हगवणे कुटुंबाला वैष्णवीच्या कुटुंबाने कोट्यवधी रुपयांचा हुंडा देखील दिला होता. विशेष म्हणजे या लग्नात अजित पवार यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन अजित पवार यांनी काल राजेंद्र हगवणेची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. त्यानंतर या प्रकरणी आपल्याला उगाच बदनाम केलं जात असल्याचं पवार यांनी बोलताना म्हंटलं आहे. वैष्णवीने मला थोडीजरी तक्रार केली असती तरी मी लगेच दखल घेतली असती, असंही यावेळी अजितदादांनी म्हंटलं आहे.