Varsha Bhoyar : पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या नवनीत राणांवर अद्याप गुन्हा का दाखल नाही? पोलीस पत्नीचा सवाल
पुढील दोन दिवसात खासदार राणांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा राजापेठ पोलीस (Police) स्टेशनसमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी दिला आहे.
अमरावती : खासदार नवनीत राणांनी (Navneet Rana) पोलिसांचा अपमान केला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अमरावतीमधील पोलीस पत्नी आणि शिवसेना पदाधिकारी वर्षा भोयर (Varsha Bhoyar) यांनी पोलिसांकडे केली आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांशी चार दिवसांपूर्वी राणांनी हुज्जत घातली होती. दोन दिवसांपूर्वीच पोलीस बॉइज संघटनेने राजापेठ पोलिसांना निवेदनही दिले होते. राणा यांच्या विरोधात हातात पोस्टर घेऊन भोयर या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. सरकारी कामात अडथळा आणला तर सर्वसामान्य व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जातो. मग नवनीत राणांवर गुन्हा दाखल का नाही? पुढील दोन दिवसात खासदार राणांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा राजापेठ पोलीस (Police) स्टेशनसमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी दिला आहे.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली

