Vasant More : … मराठी माणूस येऊ शकत नाही, वसंत मोरे नेमकं काय म्हणाले? ठाकरे बंधूंच्या मोर्चाची वेळ बदलली?
हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू येत्या ५ जुलै रोजी सकाळी दहा वाजता मुंबईत एकत्रित मोर्चा काढणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस सहभागी व्हावा, यासाठी ठाकरे बंधूंकडून आवाहन करण्यात आलं आहे.
सकाळी दहा वाजता राज्यातील माणूस मोर्चाला एकत्र येऊ शकत नाही, असं ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. तर मोर्चाची वेळ लवकरच ठरेल अशी माहिती देखील वसंत मोरे यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना दिली. ‘कोणत्याही राजकीय पक्षांचा झेंडा या ठाकरे बंधूंच्या मोर्चात नसल्याने तमाम मराठी बांधव या मोर्चाला येणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जी लढाई सुरू केली ती मराठी माणसासाठी आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस एकत्र जमणार आहे‘, असं वसंत मोरे म्हणाले. तर ‘मुंबईतून निघणारा हा मोर्चा सकाळी दहा वाजता आहे. मात्र ही वेळ सगळ्यांना सोयिस्कर नाही कारण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मराठी माणूस दहा वाजता येऊ शकणार नाही. त्यामुळे आज उद्या या मोर्चाची नवी वेळ कळेल‘, असं वसंत मोरे म्हणाले.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

