वेदांता प्रकल्प बाहेर जाता कामा नये: अजित पवार
सरकारने पूर्ण प्रयत्न करुन वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प ठरलेल्या जागेवर पुन्हा उभा करण्याची मागणी अजित पवार यांनी यावेळी केली आहे.
राज्यात येणारा वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. हा प्रकल्प दुसरीकेड गेल्यानंतर येथील रोजगाराविषयी निर्माण झालेला प्रश्न गंभीर असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्राकडून मदत घ्यावी आणि या प्रकल्पासह इतर प्रकल्पही राज्यात आणावेत अशी मागणी अजित पवार यांनी केली. हा प्रकल्प राज्यातून गेल्यामुळे लाखो मुलांचा रोजगार निघून गेल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. राज्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी सरकारने पूर्ण प्रयत्न करुन वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प ठरलेल्या जागेवर पुन्हा उभा करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

