Dadasaheb Phalke Award | अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
VIDEO | ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
मुंबई, २६ सप्टेंबर २०२३ | ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून दिली आहे. ‘वहिदा रहमान यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल या वर्षी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, हे जाहीर करताना मला आनंद आणि सन्मान वाटत आहे.’, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करून म्हटले आहे. दिग्गज कलाकारांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल नामांकित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. त्याप्रकारे ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वहिदा रहमान यांनी अभिनेते देवानंद यांच्यासोबत सीआयडी सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण केलं होतं. वहिदा रहमान यांनी ७० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं आणि वहिदा रहमान आणि देव आनंद यांच्या जोडीला चाहत्यांचं खूप प्रेम मिळालं.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

