Hinganghat Verdict | अंकिता जळीतकांडातील आरोपीला जन्मठेप

| Updated on: Feb 10, 2022 | 9:17 PM

प्राध्यापक अंकिता पिंसुडे जळीतकांड प्रकरणात आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

Hinganghat Verdict | अंकिता जळीतकांडातील आरोपीला जन्मठेप
Follow us on

प्राध्यापक अंकिता पिंसुडे जळीतकांड प्रकरणात आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. अंकिता पिंसुडे यांच्या मृत्यूप्रकरणी आरोपींना झालेली शिक्षा नगराळेसारख्या मनोविकृत माणसांसाठी चाप आहे. त्यामुळे समाजात अशा एकतर्फी प्रेमातून घडलेल्या किंवी घडत असलेल्या घटनांनाही आळा बसणार असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे वर्धा पोलिसांचा विश्वास वाढला आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे अंकिता यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. न्यायालयाकडून सुनावण्यात येत असलेल्या अशा निकालामुळे समाजात न्यायपालिकेवरचा विश्वास आणखी दृढ होतो, त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसतो.