Vicky- Katrina Wedding | विकी-कतरिना लग्नासाठी राजस्थानकडे रवाना, सवाई माधोपूरमध्ये घेणार सात फेरे

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी रविवारी रात्री कायदेशीररित्या रजिस्टर पद्धतीने लग्न केले. स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार लग्न केल्यानंतर विकी आणि कतरिना जयपूरसाठी रवाना झाले आहेत. चाहत्यांच्या नजरा सध्या विकी आणि कतरिनाच्या हालचालींवरही लागल्या आहेत. दोघेही 9 डिसेंबरला लग्न करणार आहेत. मात्र अद्याप दोघांकडूनही त्यांच्या लग्नाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी रविवारी रात्री कायदेशीररित्या रजिस्टर पद्धतीने लग्न केले. स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार लग्न केल्यानंतर विकी आणि कतरिना जयपूरसाठी रवाना झाले आहेत. चाहत्यांच्या नजरा सध्या विकी आणि कतरिनाच्या हालचालींवरही लागल्या आहेत. दोघेही 9 डिसेंबरला लग्न करणार आहेत. मात्र अद्याप दोघांकडूनही त्यांच्या लग्नाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण जयपूरमध्ये कतरिना आणि विकीसह तिच्या कुटुंबीयांची उपस्थिती त्यांच्या लग्नाच्या बातमीला पुष्टी देते.

विकी आणि कतरिनाने त्यांच्या रॉयल वेडिंगसाठी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेसचा किल्ला निवडला आहे. किल्ला दिव्यांनी सजवण्यात आला आहे. या रॉयल वेडिंगचे संगीत 7 डिसेंबरला होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल एकमेकांसाठी संगीतावर खास परफॉर्मन्स देणार आहेत. याशिवाय कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळीही खास परफॉर्मन्स देणार आहेत. या संगीतात नेहा कक्कर आणि रोहनप्रीत देखील आपल्या अभिनयाने ठसा उमटवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI