Video: प्रत्येक पक्षाला ऊन-सावली असतेच, पंकजा मुंडे भाजप सोडणार नाही- महादेव जानकर
प्रत्येकच पक्षाला ऊन-सावली असते. गोपीनाथ मुंडे यांचे संपूर्ण आयुष्य भाजपमध्ये गेले आहे, तसेच पंकजा मुंडे यांनी देखील पक्षासाठी मेहनत घेतली आहे, त्यामुळे त्या भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही असे जानकर म्हणाले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. रासप ने कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी यापूर्वीच केली असल्याचे जानकर म्हणाले. तसा प्रस्ताव देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याचे ते म्हणाले. पंकजा मुंडे यांच्या पक्ष नाराजीच्या चर्चेवर देखील त्यांनी भाष्य केले. प्रत्येकच पक्षाला ऊन-सावली असते. गोपीनाथ मुंडे यांचे संपूर्ण आयुष्य भाजपमध्ये गेले आहे, तसेच पंकजा मुंडे यांनी देखील पक्षासाठी मेहनत घेतली आहे, त्यामुळे त्या भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही असे जानकर म्हणाले. पंकजा मुंडे भाजप सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चां राजकीय वर्तुळात रंगू लागल्या असताना जानकर यांनी मात्र आपले मत स्पष्ट केले.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
