Chandrapur | चितळाची थक्क करणारी उडी पाहिलीत का?

तलावाच्या काठी आलले्या या हरणानं पाण्याचा आस्वादही घेतला. मात्र याच वेळी काही कुत्रे मागे लागल्यानं हरिणानं पळ काढला. जीवाच्या आकांतानं पळणाऱ्या हरिणाची दौड तर थक्क करणारी होतीच. शिवाय या प्रकारे या हरिणानं हवेत भलीमोठी झेप घेत रस्ता ओलांडला, तेही अचंबित करणारं होतं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 16, 2022 | 6:41 PM

चंद्रपूर : एक व्हिडीओ चंद्रपुरात फार व्हायरल (Viral Video) झाला आहे. एक हरीण एखाद्या पक्षाप्रमाणे हवेत झेपावलं आहे. ही झेप इतकी मोठी होती, की उपस्थित उडी घेणारा नक्की हरीणच (Deer) होता ना? याबाबत शंका घेऊ लागले. अत्यंत चपळाईनं पळत येत, हरणाने रस्ता ओलांडताना झेप घेतली, ती एकानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात (Mobile Camera) टिपली आहे. ही झेप नेमकी कुठची आहे? कुणी ती मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपली आहे? याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हरिणाची झेप पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. तहानलेलं हरिण पाण्यासाठी व्याकूळ झालं होतं. तलावाच्या काठी आलले्या या हरणानं पाण्याचा आस्वादही घेतला. मात्र याच वेळी काही कुत्रे मागे लागल्यानं हरिणानं पळ काढला. जीवाच्या आकांतानं पळणाऱ्या हरिणाची दौड तर थक्क करणारी होतीच. शिवाय या प्रकारे या हरिणानं हवेत भलीमोठी झेप घेत रस्ता ओलांडला, तेही अचंबित करणारं होतं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें