Nashik | लासलगाव बाजारसमितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांत शाब्दिक बाचाबाची

Nashik | लासलगाव बाजारसमितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांत शाब्दिक बाचाबाची

| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 8:50 PM

लासलगाव बाजार समितीत शेतकरी तसेच व्यापाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला. शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये मक्याचे पीक विकायला आणले होते. मका विकल्यानंतर व्यापाऱ्याने ते गोडाऊमध्ये खाली करायला नेले मात्र खाली करताना मक्याच्या दर्जाबद्दल तक्रार केली. याच कारणामुळे नंतर शेतकरी आणि व्यापारी यांच्यात वाद झाला.

लासलगाव बाजार समितीत शेतकरी आणि व्यापारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. लिलावानंतर व्यापाऱ्याने मक्याबद्दल तक्रार केल्यामुळे हा वाद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लासलगाव बाजार समितीत शेतकरी तसेच व्यापाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला. शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये मक्याचे पीक विकायला आणले होते. मका विकल्यानंतर व्यापाऱ्याने ते गोडाऊमध्ये खाली करायला नेले. मात्र खाली करताना व्यापाऱ्याने मक्याच्या दर्जाबद्दल तक्रार केली. याच कारणामुळे नंतर शेतकरी आणि व्यापारी यांच्यात वाद झाला.