video | राष्ट्रवादी हातून गेल्यानंतर शरद पवार यांची पहीली प्रतिक्रीया
पुण्यात निखिल वागळे आणि इतर जाणकार व्यक्तींवर झालेला हल्ला योग्य नाही. आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ इच्छीतात. ही झुंडशाही लोकांना आवडत नाही. सत्ता हातात आहे आणि पोलिस यांचा गैरउपयोग घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुण्यातील आणि महाराष्ट्रातील समंजस आणि सुज्ञ नागरिक अशा प्रकारांना पाठींबा देणार नाही. ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे कार्य केले त्या पक्षाच्या नेत्यांनी याची हवी तेवढी दखल घेतली नाही हे दुर्दैव असल्याचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.
पुणे | 11 फेब्रुवारी 2024 : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाच्या ताब्यात दिल्यानंतर पाच दिवसांनी राष्ट्रवादीचे बुजुर्ग नेते शरद पवार यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. या निर्णयाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. याबद्दल शरद पवार म्हणाले की माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की, मी पहिली निवडणुक बैलजोडीवर लढलो. नंतर ते चिन्ह गेले. मग चरख्यावर लढलो. नंतर ते चिन्ह गेलं मग हातावर लढलो. नंतर घड्याळावर निवडणुक लढलो. लोकांच्या दृष्टीने कार्यक्रम आणि विचार महत्वाचा, चिन्ह नाही, चिन्ह मर्यादीत कामासाठी उपयुक्त असते असे शरद पवार यांनी सांगितले. अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष दुसऱ्याला दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्याला सोडून दुसऱ्याला पक्ष देणे हे असे देशात पहिल्यांदाच घडलं आहे. माझी खात्री आहे लोक या सगळ्या गोष्टींना समर्थन देणार नाहीत. आम्ही सुप्रीम कोर्ट गेलो आहोत. त्यासंदर्भात निकाल लवकर येईल अशी आमची अपेक्षा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता

