Vijay Wadettiwar | राज्यात 2 आठवड्यांचा लॉकडाऊन लावा, मंत्री विजय वडेट्टीवार यांची मागणी

कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 2 आठवड्यांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, विजय वडेट्टीवार म्हणाले. Vijay Wadettiwar Uddhav Thackeray

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:39 PM, 12 Apr 2021

नागपूर: राज्यातील कोरोनाचा कहर वाढलेला आहे. तज्ज्ञांच्या मते मे अखेरीपर्यंत राज्यात विस्फोटक परिस्थिती राहील. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 2 आठवड्यांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाहीच, असं सांगतानाच माणसं मरत असताना उत्सव कशाला करताय, असा सवाल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.