VIDEO | ही शेवटची निवडणूक असेल; काँग्रेस नेत्यानं केला भाजपबाबत दावा
काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप बाबत मोठं वक्तव्य करताना, मोठा दावा केला आहे. तर भाजपवर निशाना साधत टीका केली आहे
नागपूर : 26 ऑगस्ट 2023 | भाजपकडून आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवरून मोर्चे बांधणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमिवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भाच्या दोऱ्यावर आहेत. याचदरम्यान काँग्रेस नेते तथा विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.
वडेट्टीवार यांनी देश कुठल्या दिशेनं जातेय. हे यावरुन दिसतेय. विद्यापीठात भाजप पक्ष शिकवला जाणार आहे. भाजपची विचारधारा ही जातीयता, धर्मांधता आणि द्वेषाची आहे. सघाच्या विचारातून भाजपचा जन्म झाली आहे. त्यामुळे येथे महिलांचा सन्मान होत नाही.
तर भाजपचा ईतिहास हा सांगण्यासारखा नाही. भाजप स्वातंत्र्यलढ्यात नव्हतं. तर भाजप हा इंग्रज, पोर्तुगिज, मुघल या सत्ताधाऱ्यांच्याबरोबर होते. आता स्व:ताची विचारधारा रुजवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. देशाची विभागणी करण्याचे काम केलं जात आहे. ही भूमिका देशवासियांनी समजली पाहीजे. आणि ती लोकांच्या लक्षात आली आहे. म्हणूनच ही भाजपची ही शेवटची निवडणूक असेल.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

