Vijay Wadettiwar | मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरु होणार नाही : विजय वडेट्टीवार
मुंबईकरांचा लोकलचा प्रवास अजून लाबंताना दिसत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यानंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही मुंबईची लोकल इतक्यात सुरू होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे.

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. मुंबईची लोकल कधी सुरू होणार?, असा सवाल वडेट्टीवार यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातून कोरोना गेलेला नाही. काही जिल्ह्यात अजूनही कोरोनाची चिंताजनक स्थिती आहे. त्यामुळे स्वत:हून मृत्यूला आमंत्रण देऊ नये. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावेत, असं आवाहन त्यांनी केलं.
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?