Vikram Gokhale LIVE | शाहरुख-आर्यन नाही, बॉर्डरवरील शहीद जवान माझा नायक : अभिनेते विक्रम गोखले

पत्रकार परिषद घेत विक्रम गोखले यांनी आपली मतं स्पष्ट केली आहेत. यावेळी त्यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे देखील म्हटले आहे. या पत्रकार परिषदेत त्यांची मुलगी नेहा गोखले देखील त्यांच्यासोबत होती. 

मुंबई : ‘1947ला भिक मिळाली, खरं स्वातंत्र्य तर 2014मध्ये मिळालं’, या कंगनाच्या (Kangana Ranaut) वादग्रस्त वक्तव्याला पाठींबा दिल्याबद्दल जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर पत्रकार परिषद घेत विक्रम गोखले यांनी आपली मतं स्पष्ट केली आहेत. यावेळी त्यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे देखील म्हटले आहे. या पत्रकार परिषदेत त्यांची मुलगी नेहा गोखले देखील त्यांच्यासोबत होती. कंगना रनौत या मुलीने गेल्या दोन वर्षात जी काही वक्तव्ये केली ती मला माहित नाहीत, मात्र तिने स्वातंत्र्याविषयी जे वक्तव्य केलं त्याला तिची काही करणे असतील. त्या तिच्या म्हणण्याला मी दुजोरा दिला, त्याला माझीही काही कारणं असू शकतात. ती समजून न घेता ताबडतोब धुरळा उडवायला सुरुवात केली. मी त्या मुलीला ओळखत देखील नाही, तिच्यासोबत काम देखील केलेलं नाही. काही संबंध नाही. पण एखाद्या गोष्टीवर वैयक्तिक मत व्यक्त करणे हा माझा अधिकार आहे, असे विक्रम गोखले म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI