Nanded Sarpanch | चिटमोगरा गावच्या सरपंचाच्या मनमानी काराभाराविरोधात गावकऱ्यांनी थोपटले दंड, स्वस्त धान्य दुकानातील अनागोंदीविरोधात उठवला आवाज
Nanded Sarpanch | नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील चिटमोगरा गावातील सरपंचाच्या मनमानी काराभाराविरोधात गावकऱ्यांनी आंदोलन केले.
Nanded Sarpanch | नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील चिटमोगरा गावातील सरपंचाच्या (Sarpanch) मनमानी काराभाराविरोधात गावकऱ्यांनी आंदोलन केले. गावातील स्वस्त धान्य दुकान (Ration Shop) सरपंचाच्याच घरातील सदस्याकडे आहे. त्यामुळे सरकारकडून प्राप्त धान्य वाटप करताना सरपंच ते मोजूनही देत नसल्याचा आरोप काही गावकऱ्यांनी केला. स्वस्त धान्य दुकानासमोर गावकऱ्यांनी घोषणा ही दिल्या. हे दुकान महिन्यातील 25 दिवस तरी किमान सुरु ठेवावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली. तसेच सरपंचाच्या मनमानी कारभाराविरोधात त्यांनी आवाज उठवला.
सरपंचाकडून धमकी
स्वस्त धान्य दुकानदार आणि सरपंच पद एकाच घरात असल्याने जनतेची अफाट लूट होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच सरपंच ग्रामस्थांना धान्य देताना धमकावतात. वेळेवर धान्य देत नसल्याचा आरोप ही गावकऱ्यांनी केला. या लुटीविरोधात त्यांनी आवाज उठवला.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

