Vinayak Mete Passed Away : विनायक मेटेंच्या निधनानं मित्र गमावला- माजी मंत्री अर्जुन खोतकर
Vinayak Mete Passed Away : 'विनायक मेटेंच्या निधनानं मित्र गमावल्याची भावना माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी व्यक्त केली आहे. समाजाचे प्रश्न मांडणारा एक लढवय्या आम्ही गमावलाय, असं खोतकर म्हणालेत.
मुंबई : आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं निधन झालं. आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. राज्यासाठी मोठी पोकळी असल्याची भावना दिग्गजांनी विनायक मेटेंच्या निधनावर (Vinayak Mete Passed Away) व्यक्त केली आहे. यावर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘निधनाची बातमी सकाळी आली. विनायक मेटेंच्या निधनानं मित्र गमावला आहे, अशी भावना माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे. समाजाचे प्रश्न मांडणारा एक लढवय्या आम्ही गमावलाय, असंही अर्जुन खोतकर यावेळी म्हणालेत. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. ही घटना खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ घडली. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाला.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका

