Sanjay Shirsat : संभाजीनगरच्या विट्स हॉटेलच्या मुद्यावरून विधान परिषदेत गदारोळ
Sambhajinagar News : संभाजीनगर येथील विट्स हॉटेलच्या मुद्द्याने आज विधान परिषदेत जोरदार चर्चा घडवली.
छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेलच्या मुद्द्याने आज विधान परिषदेत जोरदार चर्चा घडवली. विरोधकांनी लक्षवेधी मांडत हा विषय सभागृहात उपस्थित केला, ज्यामुळे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, मी या विषयावर बोलण्यास इच्छुक नव्हतो, परंतु विरोधी पक्षनेत्यांनी माझे नाव घेतल्याने मला बोलावे लागत आहे. हे हॉटेल 30 वर्षांपूर्वी स्थापन झाले. काही भागधारकांनी एकत्र येऊन कंपनी स्थापन केली, पण नंतर त्यांना फसवणुकीचा अनुभव आला. त्यामुळे ते न्यायालयात गेले. ही संपूर्ण प्रक्रिया न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली झाली असून, हॉटेलच्या किंमतीचा निर्णयही न्यायालयाने घेतला आहे, अधिकाऱ्यांनी नाही, असं शिरसाट यांनी म्हंटलं.
शिरसाट यांच्या उत्तरादरम्यान विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला, ज्यामुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणातील संपूर्ण प्रक्रिया महसूल मंत्र्यांनी रद्द केली आहे आणि नव्याने प्रक्रिया राबवली जाईल. ते पुढे म्हणाले की, मंत्र्यांनी आपला खुलासा सादर केला आहे, तो तुम्हाला मान्य असो वा नसो. तथापि, या प्रकरणात पारदर्शकता असावी, यासाठी विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांनुसार अटी-शर्ती किंवा प्रक्रियेत काही अनियमितता झाली आहे का, याची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

