उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशीदीचा मुद्दा कोर्टात सुरु असतानाच महाराष्ट्रातून आता मोठी बातमी आहे. समस्त वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेलं पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे पूर्वी बौद्ध धर्माचं विहार होतं, असा दावा ज्येष्ठ साहित्यिक आणि अभ्यासक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केला आहे. आजही विठ्ठल मंदिरातील भिंतींवर भगवान बुद्धांच्या मूर्ती आहेत, यासह ओडीसातील जगन्नाथपुरी, तिरुपती बालाजी, उज्जैन महाकाली यासह असंख्य प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे होती. आमची विहारं पाडून मंदिरं आणि मशीदं बनवली, असा आरोप डॉ. आगलावे यांनी केला आहे. आगलावे यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. त्यानंतर वारकरी संप्रदायांनीही त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे.