एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली

एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली

| Updated on: Aug 31, 2026 | 11:54 PM

एसआयआरच्या पहिल्या यादीतून महाराष्ट्रातल्या दोन कोटी सात लाख मतदारांची नावं वगळली आहेत. यादीत नाव नसलेल्यांना 30 सप्टेंबरपर्यंत तक्रार करता येणार आहे. एसआयआर मोहिमेत महाराष्ट्रातल्या दोन कोटी सात लाख मतदारांची नावं वगळण्यात आलीयेत. नावं वगळल्यानंतरची पहिली यादी निवडणूक आयोगानं जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार यातल्या काही मतदारांनी फॉर्म जमा केले नाहीत. काही मतदारांकडे रेकॉर्ड डिजिटाईज झाले […]

एसआयआरच्या पहिल्या यादीतून महाराष्ट्रातल्या दोन कोटी सात लाख मतदारांची नावं वगळली आहेत. यादीत नाव नसलेल्यांना 30 सप्टेंबरपर्यंत तक्रार करता येणार आहे. एसआयआर मोहिमेत महाराष्ट्रातल्या दोन कोटी सात लाख मतदारांची नावं वगळण्यात आलीयेत. नावं वगळल्यानंतरची पहिली यादी निवडणूक आयोगानं जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार यातल्या काही मतदारांनी फॉर्म जमा केले नाहीत. काही मतदारांकडे रेकॉर्ड डिजिटाईज झाले नाही. काही मतदार प्रत्यक्ष पाहणीवेळी अनुपस्थित होते. काही मतदार दुसरीकडे स्थलांतरित झाले आहेत. काही मतदारांचा मृत्यू झालाय. तर काही मतदारांची नावं यादीत दोन वेळा होती. दरम्यान पहिल्या यादीतून नाव गायब असलेल्या मतदारांना 30 सप्टेंबरपर्यंत तक्रार करण्यात येणार आहे. मतदार यादीत पुन्हा नाव घालण्यासाठी फॉर्म 6, तक्रार करण्यासाठी फॉर्म 7, तर पत्ता बदलण्यासाठी फॉर्म 8 भरावा लागेल. या तक्रारींचं निवारण 29 ऑक्टोबरपर्यंत करण्यात येणार आहे. तक्रारींचं निवारण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार.

Published on: Aug 31, 2026 11:54 PM
Follow Us