Mumbai Local Video : हा कसला भलताच मोह… लोकलच्या टपावर चढला अन्… पुढे काय घडलं तुम्हीच बघा
मानखुर्द येथे धावत्या लोकलच्या टपावर चढलेल्या २५ वर्षीय अंकुर पांडे नावाच्या तरुणाला उच्च दाबाच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार झटका बसला. ही घटना वडाळा-पनवेल हार्बर मार्गावर घडली.
वडाळा–पनवेल हार्बर मार्गावरील लोकल गाडीच्या टपावर चढण्याचा मोह एका तरुणाच्या चांगलाच अंगाशी आला आहे. मानखुर्द परिसरात गाडी धावत असताना टपावर चढलेल्या २५ वर्षीय अंकुर पांडे नावाच्या तरुणाला उच्चदाबाच्या तारेतून वाहणारा जबर विद्युतप्रवाहाचा झटका बसला. यानंतर आरडाओरड सुरू झाल्यानंतर हा प्रकार सर्वांच्या लक्षात आला.
मानखुर्दहून गाडी वाशी स्थानकात पोहोचताच प्रवाशांच्या आरडाओरडीनंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा आढावा घेतला. यावेळी रेल्वे पोलिसांना अंकुर पांडे नावाचा हा तरुण टपावरून खाली पडून अंग भाजलेल्या अवस्थेत आढळला. रेल्वे पोलिसांकडून त्याला तत्काळ वाशीतील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा तरुण एका इंटेरिअर कंपनीत कामाला असल्याचे समजते आहे. सध्या तरुणाची प्रकृती गंभीर असून, या प्रकरणाचा पुढील तपास वाशी रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

