दीपक केसरकर पाठोपाठ गुलाबराव पाटील यांचेही उद्धव ठाकरे यांना उत्तर
गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेली ३५ वर्षे आपण असल्याचे म्हणत त्यांचे शब्द प्रयोग आपल्याला चांगलेच माहित असल्याचे म्हटलं आहे
जळगाव : रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदेंसह शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर टीका केली होती केली. यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्या आमदारांचा उल्लेख रक्त पिणारे ढेकूण असा केला होता. त्या टीकेला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेली ३५ वर्षे आपण असल्याचे म्हणत त्यांचे शब्द प्रयोग आपल्याला चांगलेच माहित असल्याचे म्हटलं आहे. तर आम्ही रक्त पिणारं नाही तर रक्त देणारे ढेकूण असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. गुलाबराव पाटील यांच्याआधी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देखिल उद्वव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं होतं.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
