Eknath Shinde : एनडीआरएफच्या नियमापेक्षा शेतकऱ्यांना दुप्पट रक्कम देण्याचा निर्णय, एकनाथ शिंदेंची माहिती

एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे 6 हजार 800 मिळत होती. त्यापेक्षा दुप्पट मदत आम्ही देणार आहोत. म्हणजे प्रतिहेक्टर 13,600 रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय.

प्रदीप गरड

|

Aug 10, 2022 | 6:01 PM

मुंबई : राज्यात 15 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या (Farmer Help) मागणीनुसार, त्यांना दिलासा देण्यात आला आहे. आतापर्यंत कधीही नुकसान भरपाई मिळाली नाही तेवढी, म्हणजे एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जी मदत दिली जात होती त्याच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय झालाय. नव्या मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी ही मोठी घोषणा केली आहे. तसेच दोन हेक्टरची मर्यादा वाढवून आम्ही ती 3 हेक्टर केली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे 6 हजार 800 मिळत होती. त्यापेक्षा दुप्पट मदत आम्ही देणार आहोत. म्हणजे प्रतिहेक्टर 13,600 रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय. दरम्यान, अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें