आम्ही ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणार- देवेंद्र फडणवीस
जेवढ्या निवडणुका येतील त्यात आरक्षण असो की नाही आम्ही ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणार, असा निर्धार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.
काही वाटेल ते झाले आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तरी ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) लढा लढला जाईल. जेवढ्या निवडणुका येतील त्यात आरक्षण असो की नाही आम्ही ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणार, असा निर्धार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. मुंबईत ते बोलत होते. भाजपा ओबीसी मोर्चातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टीका केली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाचा विषय चिघळला असल्याचे ते म्हणाले.
Published on: May 07, 2022 01:41 PM
Latest Videos
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...

