Mumbai High Tight : मुंबईकरांनो सावधान! समुद्रात आज सर्वात मोठी भरती; उंच लाटा उसळणार
Mumbai High Tight Alert : मुंबईत आज सर्वात मोठी भरती येणार आहे. समुद्रात 4.75 मीटर उंच लाटा यावेळी उसळणार आहेत.
मुंबईत आज सर्वात मोठी भरती येणार आहे. समुद्रात 4.75 मीटर उंच लाटा यावेळी उसळणार आहेत. त्यामुळे हवामान विभागाने अलर्ट जारी केलेला आहे. तसंच मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहावं अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मुंबईत २८ जूनपर्यंत सलग समुद्राला मोठी भरती येणार असल्याचे मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे. यंदाच्या पावसाळ्यातील भरतीचा तपशील मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर करण्यात आला. त्यानुसार यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा २६ जून २०२५ रोजी उसळणार आहेत. चार दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रकिनाऱ्या नजीक जावू नये, तसेच पालिकेच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

