शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर फैसला होणार की पुन्हा कोर्टाकडे? नेमका निकाल काय?
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या निकालाकडे लागलं आहे. ११ मे २०२३ रोजी सुप्रीम कोर्टाने सत्तासंघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टानं आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाचं प्रकरण राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपावलं आहे. पण त्यावेळी निकालाचे निर्देशही दिलेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १० जानेवारी २०२४ : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या निकालाकडे लागलं आहे. शिंदेंच्या १६ आमदारांचं आणि ठाकरेंच्या १४ आमदारांचं नेमकं काय होणार? याची उत्सुकता सगळ्यांना आहे. पण निकाल देण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी मूळ राजकीय पत्र कोणता हे सांगावं लागेल. त्यामुळे अपात्रतेच्या निकालावर राहुल नार्वेकर ठोस निर्णय देणार की सुप्रीम कोर्टात पुन्हा हे सगळं प्रकरण जाणार..हा देखील मुद्दा उपस्थित केला जात आहे. शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणावर काही तासातच निर्णय येणार आहे. पण त्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वासच व्यक्त केलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या भेटीवर बोट ठेवत निकालाची कल्पना आल्याचा टोला लगावला आहे. ११ मे २०२३ रोजी सुप्रीम कोर्टाने सत्तासंघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टानं आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाचं प्रकरण राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपावलं आहे. पण त्यावेळी निकालाचे निर्देशही दिलेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

