Special Report | Nitesh Rane यांचं नेमकं काय होणार?-TV9
सिंधुदुर्गातील स्थानिक शिवसेना नेते संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांना अटक होणार की दिलासा मिळणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.
मुंबई : सिंधुदुर्गातील स्थानिक शिवसेना नेते संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांना अटक होणार की दिलासा मिळणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी आज पार पडली. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आज पूर्ण झाला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद शांतपणे ऐकून घेतला. दरम्यान, कोर्टाची वेळ संपल्यानं या प्रकरणाचा निकाल उद्या दुपारी 3 वाजता लागणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना खालच्या कोर्टात जाण्याचे आदेश दिले होते. तसंच त्यांना अटकेपासून संरक्षणही देण्यात आलं होतं. त्यानुसार नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या या अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली आहे.
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा

