Breaking | शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप जारी, पावसाळी अधिवेशनात हजर राहण्याचे आदेश

अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. (Whip issued to all Shiv Sena MLAs, order to attend monsoon session)

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) पाच आणि सहा जुलैला होत आहे. या अधिवेशनात संपूर्ण दिवस उपस्थित राहायच आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या (Shivsena MLA and MLC) सर्व आमदारांनी संपूर्ण अधिवेशन पूर्ण दिवस उपस्थित राहिले पाहिजे, असा पक्षादेश व्हीप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते कार्यालयाद्वारे शिवसेनेच्या आमदारांना  जारी केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI