AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tanaji Sawant on Thackeray | कसलं शक्ती प्रदर्शन हा तर शक्तीपात, आदित्य ठाकरे यांच्यावर तानाजी सावंत यांचा पलटवार

Tanaji Sawant on Thackeray | कसलं शक्ती प्रदर्शन हा तर शक्तीपात, आदित्य ठाकरे यांच्यावर तानाजी सावंत यांचा पलटवार

| Updated on: Aug 02, 2022 | 2:04 PM
Share

Tanaji Sawant on Thackeray | आदित्य ठाकरे यांचे शक्तिप्रदर्शन नव्हे त्याचा शक्तिपात झालेला आहे, असा टोला शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी हाणला आहे.

Tanaji Sawant on Thackeray | आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे शक्ती प्रदर्शन नव्हे तर शक्ती पात झाल्याचा टोला शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांनी हाणला. त्यांच्याकडे आज एकही शिवसैनिक उरलेला नाही. ‘कोण आदित्य ठाकरे? एक आमदार आहे तो, यापेक्षा मी जास्त महत्व देत नाही ‘ असं वक्तव्य करत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. शिवसैनिकांची शक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले. कात्रज भागात आदित्य ठाकरे यांची आज सभा होत आहे. त्यांच्या सभेच्या स्थानापासून हाकेच्या अंतरावर शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांचा बंगला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. ते आज आमदार तानाजी सावंत यांची ही भेट घेणार आहेत. त्यांच्या बंगल्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न, कार्यकर्त्यांच्या समस्या तसेच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतचा आढावा घेऊन त्याविषयीचे निर्देश प्रशासनाला देणार असल्याची माहिती सावंत यांनी यावेळी दिली.