VIDEO : फडणवीस म्हणाले, मनसुख हिरेन शेवटचे धनंजय गावडेंना भेटले, आता गावडे म्हणतात..

मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हे धनंजय गावडेंना शेवटचे (Who is Dhananjay Gawde) भेटले होते, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला

सचिन पाटील

|

Mar 09, 2021 | 1:52 PM

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसुख हिरेन प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरलं. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हे धनंजय गावडेंना शेवटचे (Who is Dhananjay Gawde) भेटले होते. त्या ठिकाणापासून 40 किलोमीटरवर हिरने यांची बॉडी सापडली, असा दावा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.

धनंजय गावडे हे वसई-विरार महापालिकेतील शिवसेनेचे नालासोपारा येथील माजी नगरसेवक होते. गावडे हे 45 वर्षीय आहेत. ते पालिकेतील गटनेता, स्थायी समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुखही होते. गावडे हे 2015 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक ६३ मधून नालासोपारा परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. परंतु, बनावट कागदपत्रांच्या मदतीने जमीन हडपल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. आचोळे येथील २६ गुंठे जमीन खरेदी प्रकरणी त्यांच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे 2017 मध्ये त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें