बॉलिवूड आणि तुमच्याशी कनेक्शन काय?; नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंना सवाल

बॉलिवूड आणि तुमच्याशी कनेक्शन काय?; नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंना सवाल

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Oct 16, 2021 | 1:08 PM

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना घेरले आहे. फ्लेचर पटेलसोबत फोटोत असलेली लेडी डॉन कोण आहे? या लेडी डॉनचा तुमच्याशी संबंध काय? तिचं बॉलिवूडशी काय कनेक्शन आहे? असे सवाल नवाब मलिक यांनी वानखेडेंना केले आहेत.

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना घेरले आहे. फ्लेचर पटेलसोबत फोटोत असलेली लेडी डॉन कोण आहे? या लेडी डॉनचा तुमच्याशी संबंध काय? तिचं बॉलिवूडशी काय कनेक्शन आहे? असे सवाल नवाब मलिक यांनी वानखेडेंना केले आहेत.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एका लेडी डॉनच्या हस्तक्षेपावरून एनसीबीला घेरले. या प्रकरणातील लेडी डॉन कोण आहे? तिच्याशी तुमचा संबंध काय आहे? असा सवाल मलिक यांनी केला. ही लेडी डॉन एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ती आहे. ती वकील आहे. तसेच वानखेडेंची लेडी डॉन नातेवाईक असून फ्लेचर पटेल तिला लेडी डॉन संबोधत असल्याचंही मलिक यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us